भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एअर फोर्समध्ये ग्रुप सी सिविलियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. )
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२५ आहे. मुदतीनंतर तुमचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. भारतीय हवाई दलात १४८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
कोणती पदे भरली जाणार?
1)निम्न श्रेणी लिपिक (LDC) 14
2) हिंदी टायपिस्ट 02
3) स्टोअर कीपर 16
4) सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG) 08
5) कुक (Ordinary Grade) 12
6) पेंटर (Skilled) 03
7) कारपेंटर (Skilled) 03
8) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 31
9) लॉन्ड्रीमन 03
10) मेस स्टाफ 07
11) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 53
12) व्हल्कनायझर 01
पात्रता काय?
या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. एलडीसी क्लर्क पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. तर काही पदांसाठी १० वी उत्तीर्ण आवश्यक आहे.तसेच हिंदी टायपिस्ट पदासाठी तुम्हाला टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे.
वयोमर्यादा
वयोमर्यादा- फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. तर राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.
निवड प्रक्रिया- या हवाई दल भरतीमध्ये, उमेदवारांना लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी/प्रॅक्टिकल/शारीरिक चाचणी इत्यादी टप्प्यांतून जावे लागेल.
अर्ज कसा करावा:
पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- . अर्जासोबत सेल्फ अॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.















Discussion about this post