नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता खुशखबरी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नो टेन्शनच असणार आहे. ही भरती विविध पदांसाठी पार पडत असल्याने कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.खरोखरच ही मोठी संधीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 74 जागा भारण्यांसाठी भरती होत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन उमेदवारांना असणार आहे. चला तर मग वेळ कशाला घालता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 28 पर्यंत असावे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही उमेदवाराकडे असावी. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण https://www.aiasl.in/index या साईटला भेट देऊ शकता, तिथेच तुम्हाला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला कागदपत्रांसह 16, 17, 18, 19 एप्रिल 2024 रोजी उपस्थित राहवे लागेल.
येथेभरती प्रक्रियेची अधिसूचना मिळेल.
Discussion about this post