अहमदनगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केलीये.
दरम्यान, आज अहिल्यादेवींची सर्वत्र २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री नगर येथील चौंडी येथे बोलत होते. तिथे त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव ‘अहिल्यानगर’ करणार असल्याचे जाहीर केले. अहिल्यानगर असं नामांतर करण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे. तसेच हे नामांतर झाल्यामुळे नगर जिल्ह्याचा मान देखील हिमालयाएवढा होणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यापूर्वी उस्मानाबाद आणि औरंगाबाद या जिल्ह्याचं नामकरण ‘धाराशीव’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ असं करण्यात आलं. या दोन जिल्ह्यांचं नामकरण केल्यानंतर सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचंही नामांतर करण्याचा मोठा निर्णय घेतला.