अहमदाबाद । गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दरम्यान या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे.
अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी भागात हे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. हे विमान दिल्लीहून अहमदाबादला आले होते. त्यानंतर ते लंडनसाठी रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वीच या विमानाला अपघात झाला. अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले.
स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे. अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल, पोलीस, आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Discussion about this post