मुंबई । एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाग मिळत नसल्याने शेतकरी हताश झालाय. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमती वाढ केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. 1 जानेवारीपासून खत उत्पादक कंपन्यांनी नवी दरवाढ जाहीर केली आहे. शेतात पिकाला खत टाकू का नको?, अशा संभ्रमात शेतकरी आहेत.
खरीप व रब्बी हंगामात पिके घ्यायची म्हटले तर रासायनिक खतांशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. खतांच्या किमती कितीही गगनाला भिडल्या तरी उसनवारी, पैसे उचलून खते खरेदी करावीच लागतात. मागील दहा वर्षांच्या काळात खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्या तुलनेत भांडवली खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. शेती करायची कशी?, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेणखत व ऊस पाचट यांचा वापर करा
शेणखत व ऊस पाचट यांचा वापर करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करावा व कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
खतांच्या किमती काय आहेत?
१०:२६:२६ पूर्वीचे भाव १३५० व वाढलेले भाव १५९०
१०:२६:२६ चे पहिले भाव १४७० व वाढलेले भाव १७९०
२०:२०:० चे पहिले भाव १३०० व वाढलेले भाव १३५०
१४:३५:१४ चे पहिले भाव १७०० तर वाढलेले भाव १८०० (Agriculture News)
खताचे सरासरी भाव २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. ट्रान्सपोर्ट खर्च व रॉ मटेरियल कॉस्टमुळे भाव वाढले असावेत.















Discussion about this post