सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. अॅग्रीकल्चर कंपनीत नोकर भरती केली जाणार आहे. व्यवस्थापकीय पदासाठी ही भरती होणार असून यासाठीची भरती प्रक्रिया सुरू झालीय. या नोकरीसाठी अर्ज कसा करायची याची माहिती आम्ही देणार आहोत. तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी २० तारखेआधी अर्ज करावा. या भरतीतून एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (CBT-संगणक आधारित चाचणी) आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा एकूण 150 गुणांची असेल, त्यासाठी उमेदवारांना 150 मिनिटे दिली जातील.
पात्रता काय
उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech//पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची जन्मतारीख २ डिसेंबर १९९४ च्या पूर्वीची नसावी आणि १ डिसेंबर २०२३ नंतरची नसावी.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. संबंधित विषयावरील अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अर्ज कसा करायचा
सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
यानंतर तुम्हाला होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर, तो सबमिट करा.
शेवटी अर्ज पूर्ण झाल्याचा मेसेज असल्याचं पेज ओपन होईल. ते डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
Discussion about this post