नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला असून या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत.मात्र या सगळ्यात सर्वसामान्यांसाठी महत्वाची बाब म्हणजे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात आणि कोणत्या वस्तू या महाग झाल्यात. याची संपूर्ण यादी तुम्हाला या बातमीत वाचायला मिळणार आहे.
मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत. त्यानुसार कॅन्सरवरील औषधांसह सोन-चांदी, मोबाईल, इलेक्ट्रिक वाहने, सोलार अशा अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर प्लास्टीकसह काही गोष्टी आता महाग होणार आहेत.
काय होणार महाग
प्लास्टिक महाग होणार
टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी वाढलं
स्टॉक मार्केटमधून इनकम होणाऱ्यांसाठी वेगळा टॅक्स भरावा लागणार त्यावरील कर वाढवण्यात आला आहे.
स्वस्त काय झाले
सोने आणि चांदी स्वस्त
प्लॅटिनमवर कस्टम ड्युटी कमी केली
कर्करोग औषधे
मोबाइल चार्जर
मासे अन्न
चामड्याच्या वस्तू
रासायनिक पेट्रोकेमिकल
पीव्हीसी फ्लेक्स बॅनर
Discussion about this post