मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता शिवसेना (उबाठा गट) खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी एका फोन कॉलच्या माध्यमाने देण्यात आली असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे.
सुनील राऊत म्हणाले, माझ्या मोबाइलवर कॉल करून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीत, रोज सकाळी सकाळी माध्यमांसोबत बोलणे बंद करा, नाहीतर त्याला गोळी घातली जाईल, असे बोलण्यात आल्याचे सुनील राऊत यांनी म्हटले आहे.
Discussion about this post