नाशिक । तुम्हालाही पनीर खाणं आवडत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न, औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत असून यातच यशवी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस मुसळगाव एमआयडीसी, या कंपनीत धाड टाकून 314 किलो भेसळयुक्त पनीरसह भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा साठा जप्त केला.
कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही धाड टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायदयांतर्गत सखोल तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने सुवर्णा महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित 53 हजार 380 रुपये किंमतीचा 314 किलो पनीरचा साठा जप्त केला.
तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेवून जप्त केला आहे. भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनास जावू नये, याकरीता नष्ट करण्यात आले.















Discussion about this post