Wednesday, February 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी विभागाच्या निवासी शाळांमध्ये सन २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू ;विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
शाळांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा
बातमी शेअर करा..!

जळगाव |  आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ६ वी तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी मधील अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

नाशिक विभागांतर्गत १. पेठ रोड, ता.जि. नाशिक, २. पिंप्री सडोदीन, ता. इगतपुरी, ३. नंदुरबार, ता.जि. नंदुरबार, ४. अजमेर सौदाणे, ता. बागलाण, ५. मवेशी, ता. अकोला, ६. पिंपळनेर, ता. साक्री, ७.टिटवे, ता. दिंडोरी, ८. ढोगसांगळी, ता. नवापूर, ९. चणकापूर, ता. सटाणा, १०. शिदें दिगर, ता. सुरगाणा, ११. सरी, ता. अक्कलकुवा, १२. रोषमाळ, ता. घडगाव, १३ देवगाव, ता. पेठ, १४. बोरीपाडा, ता. त्र्यंबकेश्वर, १५. खरवड, ता. तळोदा, १६. मोहिदा, ता. शहादा, १७. भाडणे, ता. साक्री या शाळांचा समावेश आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशास पात्र राहतील. तसेच इयत्ता ६ वी ते ९ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही प्रक्रिया लागू राहणार आहे.

या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापुरी, ता. जामनेर, जि. जळगाव येथे घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी साठी परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ व इयत्ता ७ वी ते ९ वी साठी सकाळी ११ ते दुपारी २ अशी राहील.

प्रवेश अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच सर्व संबंधित मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज स्वतःच्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांच्याकडे दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच संबंधित मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे.

ही प्रवेश प्रक्रिया शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये ६ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत. अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.

अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के तर आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव महापालिकेत भाजपची दुसरी जागा बिनविरोध ; आमदार भोळेंचे सुपुत्र विशाल भोळे बिनविरोध

Next Post

जळगाव जिल्ह्यात या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

February 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाचोरा बसस्थानकात खिसेकापू महिला टोळी जेरबंद

February 25, 2026
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज करा

February 25, 2026
‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

February 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page