जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत बारावीनंतर ‘पत्रकारिता पदविका’ (डिप्लोमा इन जर्नालिझम) या कौशल्य आधारित व रोजगारभिमुख अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
‘पत्रकारिता पदविका’ (डिप्लोमा इन जर्नालिझम) हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत सुरु करण्यात आला आहे. ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ ला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात प्रिंट, इलेक्टॉनिक मीडियासह डिजिटल मीडियाचे कौशल्य शिकता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होणार आहे. सदरचा अभ्यासक्रम पूर्णत: रोजगारभिमुख असून यशस्वी विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, ऑनलाईन पत्रकारिता, सोशल मीडिया, जाहिरात संस्था आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत येवून अर्ज व प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. अर्जासोबत बारावी उत्तीर्ण मार्कशीट, एल.सी., जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी पत्रकारिता पदविका प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर (8407922404), डॉ. गोपी सोरडे (9834166072) अथवा प्रशाळेत कार्यालयीन वेळेत 0257-2257436, 2257438 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले आहे.
Discussion about this post