जळगाव | धनगर समाजाच्या (भटक्या जमाती-क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व पाचवीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून यापूर्वी ३० जून, २०२३ पर्यत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ७ जुलै, २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन सहाय्यक आकाश साबळे-८८५५९०९६९४ व मिलींद पाटील-७९७२७६५९५५ यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन महेंद्र चौधरी, सहाय्यक लेखाधिकारी, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Discussion about this post