Tuesday, March 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उष्णतेच्या लाटेचा वाढता प्रभाव; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव | मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णताजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे, तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS), लिंबूपाणी, ताक, लस्सी व फळांचे रस यांसारख्या पेयांचा वापर करावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे व भाज्या आहारात समाविष्ट करावीत.

तसेच, पातळ, सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत. बाहेर जाताना डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा रुमालाचा वापर करावा. शक्यतो सकाळी व संध्याकाळीच बाहेरील कामांचे नियोजन करावे. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळावे. हवामानविषयक अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर माहिती घ्यावी, तसेच रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांमधील सूचना लक्षात घ्याव्यात.

लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, घराबाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर नियमित लक्ष ठेवावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटरचा वापर करावा व रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शरीर थंड ठेवण्यासाठी पंखा, ओलसर कापड, स्प्रे किंवा बर्फाचा वापर करावा.

दरम्यान, दुपारच्या वेळेत कठोर परिश्रम टाळावेत, अनवाणी बाहेर जाऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन टाळावे. उष्णतेच्या काळात उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. तसेच, उभ्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत,उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वरील उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी केलेले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव मध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा; पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

Next Post

नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नाही! खरातविरोधात अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ

नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नाही! खरातविरोधात अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगावात उन्हाचा पुन्हा तडाखा; एका दिवसात तापमानाची ४ अंशांची झेप

March 24, 2026
इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेकडून थेट तारीख जाहीर

इराण-इस्रायल युद्ध कधी संपणार? अमेरिकेकडून थेट तारीख जाहीर

March 24, 2026
नोकरीची सुवर्णसंधी! न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये 279 पदांसाठी पदभरती

एनपीसीआयएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २४५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

March 24, 2026
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ

नराधमाने विद्यार्थिनीलाही सोडले नाही! खरातविरोधात अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल

March 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page