नागपूर । हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. शिंदे सेनेचे २२ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ येऊन पक्षांतराच्या तयारीत असल्याचा ‘गौप्यस्फोट’ त्यांनी केला आहे. त्यांच्या या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आदित्य ठाकरे यांनी सांगितले, सत्ताधारी पक्षातील एका गटातील २२ आमदार सीएम फडणवीसांच्या जवळ झाले आहेत. त्यांच्याकडे चांगले फंड आहेत आणि ते आता सीएमच्या तालावर नाचत आहेत. त्यापैकी एकजण स्वतःला ‘उपकप्तान’ म्हणवतो,” असा टोला त्यांनी उद्योगमंत्री उदय समंत यांच्यावर लगावला. “विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून सरकार इतके घाबरले आहे की ते विधिमंडळात चर्चा पसंत करत नाही. निवडणूक आयोगाच्या मदतीने मिळालेल्या बहुमतानंतरही विरोधी पक्षाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही भीती जनतेला दिसत आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदावरून टीका
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला २८८ जागांपैकी १० टक्के मिळाल्या नसल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी निकष पूर्ण झालेले नाहीत, असा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. मात्र, ठाकरे यांनी म्हटले, “देशभरात इंडिगो विमानांच्या रद्दीकरणामुळे सामान्य प्रवासी त्रस्त आहेत, पण भाजप नेते खाजगी विमानांनी नागपूरला येत आहेत. हे खर्च त्यांचा वैयक्तिक आहे की करदात्यांचा पैसा वापरला जातोय? सरकारला विधिमंडळात नागरिकांच्या समस्या चर्चेत आणायचीच नाही.”
गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
शिंदे गटाच्या आमदारांच्या पक्षांतराच्या अफवांबाबत बोलताना ते म्हणाले होते, “शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे, खरी शिवसेना आहे. मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन राजकारण करत नाही. आम्ही तर त्यांना मजबूत करण्यासाठी पाठीशी उभे आहोत. भविष्यात महायुती आणखी बळकट होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.















Discussion about this post