नवी दिल्ली : आधार कार्ड हे आजही भारतीयांसाठी महत्वाचा दस्तावेज असून अनेक ठिकाणी या कार्डचा उपयोग होतो. दरम्यान, आधार कार्डविषयी केंद्र सरकारने पुन्हा मोठा निर्णय घेतला.
केंद्र सरकारने आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी, हे कार्ड अपडेट करण्यासाठी निशुल्क सेवा सुरु केली होती. 15 डिसेंबरपर्यंत ही मुदत होती. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
आधार कार्डमध्ये मोफत बदल करण्याचा कालावधी पुन्हा वाढविण्यात आला आहे. आता नागरिकांना 14 मार्च 2024 रोजीपर्यंत आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला.
याठिकाणी करा मोफत बदल
या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 मार्चपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.
Discussion about this post