मुंबई । कलाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पवित्र रिश्ता आणि अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. तिने अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अखेर तिची कॅन्सरची झुंज अपयशी ठरली आहे.
आज रविवारी पहाटे चार वाजता तिच्या निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
संध्याकाळी चार वाजता अंतिम संस्कार होणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मालिकांमधून प्रियाने लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. तसेच ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. प्रिया शेवटची तुझे मी गीत गात आहे, या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, तिने मालिका मध्येच सोडली होती. याच कारण तिने आरोग्याच दिलं होतं.















Discussion about this post