मुंबई । अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. पूनमच्या मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. यावरून पूनमच्या निधनाची बातमी समोर आली आहे. तिच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नक्की पूनम पांडेचे निधन झाले आहे की ही फेक न्यूज आहे अशाप्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तिच्या चाहत्यांना यावर विश्वस बसत नाहीये. या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी धक्का बसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.
पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आणि दुःखद होती. आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमची लाडकी पूनम पांडेचे निधन झाले आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आम्ही तिला गमावले आहे. जोपण तिच्या संपर्कात आला आहे ती त्याच्याशी खूप प्रेमाने भेटली आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गोपनीयतेची विनंती करतो.’
Discussion about this post