मुंबई । बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला. श्रेयसला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आल्यांनतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता तो ठीक आहे.
47 वर्षीय श्रेयसने त्याच्या पुढच्या चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे दिवसभर शूटिंग केले. शूटिंग संपल्यानंतर तो सेटवर सगळ्यांसोबत मस्करी करत होता. काही सीन सुद्धा शूट करण्यात आले ज्यामध्ये थोडी अॅक्शन होती. शूटिंग संपवून संध्याकाळी घरी जाऊन त्याने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. तिने त्याला दवाखान्यात नेले पण वाटेत तो बेशुद्ध पडला.
श्रेयस हिंदी चित्रपटांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने इक्बाल, ओम शांती ओम, गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल 2 यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Discussion about this post