मुंबई । टीव्ही इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेते ऋतुराज सिंग यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी ऋतुराज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
ऋतुराज हे काही काळापासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. ऋतुराज सिंह यांच्या निधनाची माहिती त्यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी दिली आहे.
ऋतुराज सिंग यांनी अपनी बात, ज्योति, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट और अदालत, दीया और बाती हम यांसारख्या अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दरम्यान, अचानक ऋतुराज सिंग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज सिंग यांच्या निधनानंतर लिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
Discussion about this post