मुंबई । बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला मुंबईतील जुहू परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, Disorientation मुळे गोविंदा यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषधे देण्यात आली आणि पहाटे 1 च्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत, ज्याचे निकाल येणे बाकी आहेत.
गोविंदा 61 वर्षांचे आहेत. गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. बुधवारी अभिनेता गोविंदा यांना मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गोविंदाला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच चाहते चिंतेत दिसत आहे. तसेच गोविंदा लवकरच बरा व्हावा याची प्रार्थना करताना दिसत आहेत.
अलिकडेच गोविंदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत होते. गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसेच ते ‘टू मच’ या काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये देखील दिसले होते. चाहते आता गोविंदा यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.















Discussion about this post