मुंबई: बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यक्रमात गोविदाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
बुधवारी रात्री अभिनेता गोविंदानं माजी आमदार आणि शिंदे कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या 14 वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असं तो म्हणाला.
Discussion about this post