जळगाव : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गंभीर गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (31, जळगाव) याच्यावर एमपीडीएची कारवाई करीत त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. याबाबतची आदेश जिल्हाधिकार्यांनी काढले.
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याच्यावर रामानंदनगर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचा प्रयत्न, दरोड्या प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, जुगार खेळणे असे वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील कोणतीही बदल झाला नसल्याने रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एमपीडीए करण्याच्या कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठवल्यानंतर अवलोकनानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत केले. त्यांनतर मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याला अटक करून कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.या प्रस्तावासाठी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.