जळगाव । जळगाव महापालिकेच्या पाइपलाइन चोरी प्रकरणात तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी तातडीने बदली केली. त्यांच्या जागी संजय गायकवाड यांना पदभार सोपवण्यात आला.
पाइपलाइन चोरी प्रकरणात नाव चुकवण्यासह आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदारांनी केला होता. त्यावर सोमवारी एसपींनी ही कारवाई केली आहे. पाइपचोरी प्रकरणात तालुका पोलिसांत दाखल गुन्ह्यात माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे नाव नसणे, रिमांड नोटमध्ये सुनील सुपडू महाजन ऐवजी सुनील वामन महाजन असे नाव असणे आदींसह गुन्हा दाखल होऊन तीन आठवडे उलटूनही प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नसल्याबाबत आमदार भोळेंनी अधिवेशात प्रश्न उपस्थित केला होता. मतदारसंघात आल्यावर शनिवारी पोलिसांवर जाहीर आरोप केले होते. त्यानंतर एसपींनी ही कारवाई केली आहे















Discussion about this post