भुसावळ : जळगाव जिल्ह्यात आपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असून अशातच भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने २१ वर्षीय चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. देवेंद्र जालंदर पवार वय २१ रा. साक्री फोटा भुसावळ असे मयताचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, भुसावळ शहरातील साक्री फाटाजवळी देवेंद्र पवार हा आपल्या आईवडील पत्नी आणि भावासोबत वास्तव्याला होता. तो चालक म्हणून दिपनगर येथील केंद्रात नोकरीला होता. बुधवारी १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता बालेरो वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ९६१६) ने भुसावळ येथून दिपनगर येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्याचा चालक देवेंद्र पवार याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन हे दुभाजकावर आदळली. यात भीषण अपघातात देवेंद्रच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली.
ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या चालकाला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केल्याचे दिसून आले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रेखा, वडील जलंदर दगडू पवार, भाऊ भूषण आणि पत्नी योगिनी असा परिवार आहे.
Discussion about this post