मुंबई । राज्यात अपघाताचे सत्र थांबता दिसत नसून अशातच मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय.या अपघतामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. आज सकाळी हा अपघात झाल्याचे समजतेय.
या घटनेबाबत असे की, मुंबई नाशिक महामार्गावरवर शहापूर बुधवारी सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक व खासगी बस एकमेकांना धडकले. रात्री 3 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असल्याचे समजतेय.
मुंबई नाशिक शहापूरमध्ये भीषण अपघात झाल्याचे समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदत केली. अपघातग्रस्तांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. 1) पियुष पाटील व 2) रूद्र पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात सह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 14 जखमी आहेत, यापैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.















Discussion about this post