नांदेड – नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओ जीपचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सय्यद हुसेन (वय 32 वर्षे ) व शेख सलाम ( वय 30 वर्षे ) असं या घटनेमध्ये जागेवरच मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावं आहेत.जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड – नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओ जीपचा मोठा अपघात झला आहे. अर्धापूर कडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीने डिव्हायडर ओलांडून ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. सय्यद हुसेन (वय 32 वर्षे ) व शेख सलाम ( वय 30 वर्षे ) दोघे ही राहणार पाकीजा नगर नांदेड अशी मृतांची नावं आहेत. तर सहा जण या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. नांदेडपासून जवळच असलेल्या पिंपळगाव पाटील जवळ हा अपघात झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र स्कॉर्पिओ चालकांचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भरधाव स्कॉर्पिओने डिव्हायडर ओलांडून ट्रकला धडक धडक दिली. प्रचंड भीषण असा हा अपघात होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post