जळगाव । एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव-भुसावळ महामार्गावरील रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्दैवी म्हणजेच तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. राहुल संतोष सोनवणे (वय २१ वर्ष) असं मृत तरुणाचे नाव असून या घटनेचा त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोरपावली परिसरात शोककळा पसरली आहे.
राहुल संतोष सोनवणे (वय २१ वर्ष) व दिपक उर्फ देवेन्द्र दत्तु तायडे (वय २३ वर्ष) हे दोन्ही मित्र शाइन कंपनीच्या मोटरसायकल (क्र. एमएच १९ ईएल ४०९७) या दुचाकी वाहनाने भुसावळकडून जळगावकडे जात असतांना महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटल जवळ असलेल्या एका ढाब्याजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिली.
या झालेल्या भीषण अपघातात राहुल सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेला दीपक हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच कोरपावली गाव व परिसरात सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.















Discussion about this post