जामनेर । रस्त्यावर बंद पडलेल्या मालवाहू गाडीला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघं तरुणांचा जागीच ठार तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील वरखेडी गावाच्या पुढे घडली. जखमीवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जामनेर तालुक्यातील कुंभारी बु. येथील पितांबर डिगंबर जोशी (वय २८) व बापु रविंद्र गोपाळ (वय २७) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नवे आहेत. तर शुभम गोपाळ हा गंभीर जखमी आहे. दरम्यान तोंडापूर येथील माहवाहु बोलोरो पिकअप हि गाडी फर्दापुरकडून येत असतांना वरखेडी गावाच्या पुढे उतारावर बंद पडली. त्याच्या मागे येत असलेल्या दुचाकीवर प्रशांत रवींद्र गोपाळ, पितांबर जोशी व शुभम जयेंद्र गोपाळ हे तिघेजण कुंभारीला येत होते.
पिकअप बंद पडल्याने मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रशांत गोपाळ हा जागीच तर पीतांबर जोशी याला जळगाव येत उपचारासाठी नेत असतांना दगावला तिसरा शुभम गोपाळ जबर जखमी असल्याने याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातांची माहिती मिळाल्याने गावातील ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात प्रशांत गोपाळ व पीतांबर जोशी याच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्याने गावात शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही तरुणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. पीतांबर जोशी याला तिन मुली, पत्नी असून प्रशांत गोपाळ याला एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.
Discussion about this post