भुसावळ । भरधाव कारने धडक दिल्याने भुसावळातील महिला भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना कळवणनजीक घडली. गौरीबाई बटलू पासी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने शहरातील पासी वाड्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कळवण पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील पासी वाड्यातील २० ते २२ भाविक सप्तश्रृंगगडाकडे पदयात्रेने निघाले आहेत. यावेळी कळवणजवळ आले असता एका भरधाव कारने गौरीबाई यांना जबर धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तत्काळ कळवण येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कळवण येथे शवविच्छेदन करण्यात आले. गगौरीबाई पासी यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.
आठवडे बाजारात त्या खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करून परिवाराचे पालनपोषण करीत होत्या. याप्रकरणी कळवण पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.















Discussion about this post