जामनेर । जळगाव जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सुदैवाने वाहनांजवळ कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र या धडकेत दुचाकींचे नुकसान झाले.
जामनेर शहरातील सेंट्रल बँकेत आलेल्या ग्राहकांच्या दुचाकी वाकी रोडवरील रस्त्यालगत उभ्या केलेल्या होत्या. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान शहरातून वाकीकडे भरधाव वेगात जाणारे ट्रॅक्टर नियंत्रण सुटून या दुचाकींना धडक देत झाडावर आदळले. ट्रॅक्टर झाडावर आदळतात चालकाने पळ काढला. सुदैवाने वाहनांजवळ कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र या धडकेत बारा ते पंधरा दुचाकींचे नुकसान झाले.
Discussion about this post