Thursday, August 7, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग; ७२ टक्के पेरण्या झाल्या 

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
July 14, 2023
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता गती आली आहे. जिल्ह्यात आज‌ अखेरपर्यंत ५५४६७५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्याचे हे प्रमाण एकूण सरासरी क्षेत्राच्या ७२ टक्के इतके झाले आहे. यंदाच्या खरिपात सर्वाधिक पेरण्या जामनेर तालुक्यात ६८०१९ हेक्टर क्षेत्रावर झाल्या आहेत. पेरण्याचे हे प्रमाण एकूण सरासरी क्षेत्राच्या ६८ टक्के इतके आहे. खान्देशचे पीक म्हणून ओळख असणाऱ्या कापसाच्या ४४५७४७ हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिना हा कोरडा गेला आहे. कापूस लागवडीस उशीर झाला मात्र जुलैपासून महिन्यांपासून चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन , इतर गळीतधान्य, कापूस आदी प्रमुख पिके घेतली जातात. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये (कंसात एकूण सर्वसाधारण क्षेत्राशी टक्केवारी)- खरीप ज्वारी – १३ हजार ९९ (२९ टक्के), बाजरी – ५ हजार ४७० (३५ टक्के), मका – ५१ हजार १५६ (६० टक्के), इतर तृणधान्य – ४४५ (२१ टक्के), तूर- ५ हजार १५५ (३१ टक्के), मूग – ८ हजार ६६५ (३१ टक्के), उडीद- ७ हजार १२३ (२७ टक्के), इतर कडधान्य – १८२ (१७ टक्के), भुईमूग — ४११ (१४ टक्के), तीळ-१५२ (८ टक्के), सूर्यफूल -१४ (२३ टक्के), सोयाबीन- ९ हजार ५६ (३१ टक्के) कापूस- ४ लाख ४५ हजार ७४७ (८९ टक्के) आहे.

खरिपाचे पेरणी झालेले तालुकानिहाय हेक्टर क्षेत्र (कंसात एकूण सर्वसाधारण क्षेत्राशी टक्केवारी)- जळगाव – २५०२६ (४४ टक्के), भुसावळ – २२२१४ (७७ टक्के), बोदवड – ३२९४९ (९९ टक्के), यावल-३३७२९ (७८ टक्के), रावेर- १६५७० (५६ टक्के), मुक्ताईनगर – १४५६६ (४९ टक्के), अमळनेर -५००८९ (७२ टक्के), चोपडा- ५४१४६ (८५ टक्के), एरंडोल -२९९९० (७६ टक्के), धरणगाव – १९२६७ (४३ टक्के), पारोळा- ४२४५९ (८२ टक्के), चाळीसगाव – ६२३७० (७२ टक्के), जामनेर -६८०१९ (६८ टक्के), पाचोरा -५३२७३ (९२ टक्के), भडगाव -३००९७ (८६ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ साठी ३‎ लाख ५ हजार १४० मेट्रिक टन‎ रासायनिक खतांचे आवंटन‎ मंजुर करण्यात आले आहे. १ लाख ५७ हजार ९२ मेट्रिक टन‎ खत साठा उपलब्ध आहे. १८०० टन युरीया, २५५ टन डीएपी खतांचा बपर स्टॉक उपलब्ध आहे. खरीप पिके वाढीच्या अवस्थतेत आहेत. खतांची टंचाई नसून पुरेशा साठा विक्रीकरिता उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

शासनाने २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम शासना मार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपया भरून https://pmfby.gov.in वर स्वतः किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्रामार्फत ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावा. असे आवाहन कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीतील पुराने ४५ वर्षांचा विक्रम मोडला ; आता IMD ने जारी केलेल्या इशाऱ्याने लोकांची झोप उडाली

Next Post

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला ; अजित पवार गटाला मिळणारी खाती पहा..

Next Post
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर ; वाचा काय आहे

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला ; अजित पवार गटाला मिळणारी खाती पहा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

खुशखबर! जळगावमार्गे धावणार कोइम्बतूर-जयपूर नवीन ट्रेन, कोण-कोणत्या स्थानकांवर थांबणार?

August 7, 2025
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

राज्यातील 20 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

August 7, 2025
सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे

ग्राहकांना झटका : ट्रम्पच्या नव्या धमकीमुळे जळगावात सोने सर्वकालीन उच्चांकावर

August 7, 2025
उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

उत्तरकाशीमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकोणावीस जण अडकले

August 6, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page