मुंबई | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने मंत्रालयात मोठी कारवाई करत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईत कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र ढेरंगे याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचला. वैद्यकीय दुकानाचा परवाना निलंबन आदेश रद्द करण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला आणि पैसे स्वीकारताना राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. एसीबीकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.















Discussion about this post