मुंबई । राज्यात अल्पवयीन मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केला. मागील सहा वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलीच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
मुलीच्या पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील 2017 पासून तिचा विनयभंग करत होते. मात्र भीतीपोटी तिने लैंगिक छळाची माहिती कोणालाही दिली नव्हती. सोमवारीही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला. यावरुन संतापलेल्या बापाने तिला मारहाण केली.
यानंतर मुलीच्या आईने मुलीला मारहाणीचं कारण विचारलं. त्यानंतर मुलीने सर्व घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवरील आपबिती ऐकून आईच्या जबर मानसिक धक्का बसला. मात्र आईने न घाबरला मुलीसह पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तक्रारीची दखल घेत वडिलांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354A आणि 354B आणि POCSO कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. लवकरच पीडित मुलीचा जबाब नोंदवला जाणार आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.















Discussion about this post