जळगाव | पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अभिलाषा भिला रोकडे यांची राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही नियुक्ती केली.
अभिलाषा रोकडे या आधी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष आणि युवती जिल्हाध्यक्ष या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. तसेच त्या अखिल भारतीय समता परिषदेच्या युवती जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
अभिलाषा रोकडे यांच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ, कल्पना पाटील, रविंद्र पाटील, योगेश देसले,महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष शिवाजी महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Discussion about this post