मुंबई । राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकच जमीन जी 2014 रोजी खरेदी केली, त्याच्या किमतीमध्ये 2019 ला अधिकची किंमत दाखवण्यात आली आहे. अशाच एकूण 4 ते 5 मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावर असल्याचं न्यायालयाच्या तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयानं या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली.
Discussion about this post