जळगाव । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलगी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी परिसरात गेली होती, सायंकाळी ६ वाजेपर्यंत अल्पवयीन मुलगी पुन्हा घरी परतली नाही,
सर्वत्र शोध घेवूनही मुलगी मिळून न आल्याने अखेर दोन दिवसानंतर शुक्रवारी अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, अज्ञात व्यक्तीने काही तरी फूस लावून मुलीला पळवून नेत तिचे अपहरण केल्याचेही मुलीच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे, या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.
Discussion about this post