राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात तब्बल १९७४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागितले जात आहे.
आरोग्य विभागातील या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे. समुदाय आरोग्य अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. )
आवश्यक पात्रता
या नोकरीसाठी बीएएमएस, बीयुएमएस,बीएससी नर्सिंग, बीएससी इन कम्युनिटी हेल्थ पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी मेडिकल विषयातील पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. https://nhm.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. याच वेबसाइटवर तुम्हाला नोकरीबाबत सर्व माहिती मिळणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
आरोग्य विभागातील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी.















Discussion about this post