आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली मेट्रोपालिटन सहेलन्स यूनिटअंतर्गत उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. २३ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.tmc.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.या वेबसाइटवरुन अर्ज डाउनलोड करावा. यानंतर अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
या पदांसाठी भरती
सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षण व्यवस्थापक , डेटा विश्लेषक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार येणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज कुठे पाठवायचा?
नोकरीसाठी अर्ज पाठवताना पासपोर्ट साइज फोटो, वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र या गोष्टी आवश्यक आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ठाणे महानगरपालिका, मुख्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग ठाणे येथे पाठवायची आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची मुलाखत ११,१२ सप्टेंबर रोजी होणार आहे.
ठाणे महनगरपालिकेअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २५,००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post