आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर तथा आयुर्वेद दवाखान्यात रिक्त पदे भरण्यात येणार आहे . याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ही भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी २१ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्धवेळ योग प्रशिक्षक या पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून योग विषयाची पदवी किंवा नामांकित योग्य संस्थेचे सर्टिफाइड योग प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे. ()
सोलापूरमध्ये ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवाराला दर महिन्याला ८००० रुपये पगार देण्यात येईल. एका योग सत्रासाठी २५० रुपये मिळणार आहे.या नोकरीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीसाठी राबवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी मुलाखतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कार्यालयात उपस्थित राहायचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२५ आहे. तसेच अर्ज केलेल्या व्यक्तींना १० मार्च रोजी १०.३० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
Discussion about this post