AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी (AAICLAS) ने भरती जाहीर केली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीद्वारे एकूण १६६ पदे भरली जाणार आहे. सहाय्यक (सुरक्षा) या पदासाठी ही भरती सुरु आहे.
या पदांअंतर्गत, पटना, विजयवाडा, गोवा आणि चेन्नई आणि इतर ठिकाणी भरती केली जाईल. ही भरती तीन वर्षांच्या निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर केली जाईल.
एकूण पदे १६६
पटना २३
विजयवाडा २४
वडोदरा ९
पोर्ट ब्लेअर ३
गोवा ५३
चेन्नई ५४
आवश्यक पात्रता
मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराला हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषा लिहिणे आणि वाचणे माहित असले पाहिजे.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयाची गणना १ जून २०२५ च्या आधारावर केली जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, अधिसूचना पहा.
चांगला पगार मिळेल
निवडलेल्या उमेदवारांना भरतीच्या पहिल्या वर्षी दरमहा २१,५०० रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा २२,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा २२,५०० रुपये दिले जातील.
अर्ज कसा करावा
या पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
अंतिम तारीख: ३० जून २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
अर्ज शुल्क: सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील.
Discussion about this post