आधार सेवा केंद्रमध्ये आधार ऑपरेटर आणि सुपरवाइजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी कॉमन सर्विस सेंटरद्वारा फॉर्म भरावे लागणार आहे. ही नोकरी २३ राज्यांसाठी होणार आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. कॉमन सर्विस सेंटर हे भारत सरकारच्या डिजिटल इंडियाअंतर्गत काम करते. यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मीर,जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी अर्जप्रक्रिया सुरु आले. या नोकरीसाठी जिल्ह्यानुसार वॅकेंसी जाहीर करण्यात आली आहे. ()
आधार सुपरवाइजर आणि ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी, १२वी पास करणे गरजेचे आहे. याचसोबत दोन वर्षीय १०आयटीआय/ ३ वर्षीय पॉलिटेक्निक डिप्लोमा पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे UIDAI द्वारा प्रमाणित आधार सर्व्हिसमध्ये आधार ऑपरेटर / सुरवाइजर पदाचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कॉमप्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना राज्यानुसार निर्धारित पगार दिला जाणार आहे.
Discussion about this post