जळगाव । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडकली. यामुळे दुचाकीवर तरुण ठार झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील महेंद्रा शोरूम नजीक घडली. तर त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेबद्दल नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.
महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. जाकीर हुसेन कॉलनी,जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील यांच्यासह राहत होता. एका दाल मिल कंपनीत तो काम करीत होता. तर त्याचे आई वडील हे एमआयडीसीतील एका कंपनीत वॉचमन आहेत.(केसीएन)महेश व त्याचा मित्र आकाश पाटील हे नशिराबादच्या पुढे महेंद्र शोरूम येथे कामानिमित्ताने ये जा करायचे. शनिवारी दि. ६ जुलै रोजी ते रात्री महेंद्र शोरूम येथे गेले होते. त्यावेळेला रात्री ११ वाजेच्या सुमारास गतिरोधकावरून त्यांची दुचाकी हि नियंत्रणाबाहेर गेली व दुभाजकाला धडकली.
या भीषण अपघातात महेश माळी व आकाश पाटील गंभीर जखमी झाले. दरम्यान, महेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पाच बहिणींच्या पाठीवरील एकुलता एक भाऊ असल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आकाश पाटील हा जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.















Discussion about this post