जळगाव : धावत्या रेल्वेखाली फैजपूरातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील सावखेडा रेल्वेपुलाजवळ घडली. फिरोज रज्जाक तडवी (40, फैजपूर, ह.मु. हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवाशी फिरोज रज्जाक तडवी हे आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होते. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.
जळगाव ते शिरसोली दरम्यान गिरणा पंपिंग रस्त्यावरील सावखेडा पुलाजवळ खांबा क्रमांक 415/08 जवळ धावत्या रेल्वेच्या समोर आल्याने फिरोज तडवी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. सुरूवातील अनोळखी म्हणून जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.















Discussion about this post