जळगाव । कर्जबाजारील कंटाळून तरुण रिक्षाचालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रिक्षाचालकाने गळफास घेत आत्महत्या घडली. बिलाल शेख वलीयोद्दीन (वय-३१) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील नागोरी डेअरीच्या गल्लीत बिलाल शेख वलियोद्दीन (वय-३१) हा त्याची चार वर्षाची मुलगी आणि पत्नीसह वास्तव्यास होता. कोरोना काळा नंतर कर्जबाजारु झाल्यापासुन हा तरुण प्रचंड तणावात राहत असल्याचे त्याच्या परिचीतांनी माहिती देतांना सांगीतले आज शनिवार(ता.३१) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे पत्नीला आढळून आले.
पतीला पाहताच पत्नीने हंबरडा फोडला. शेजार्यांनी मदतीला धाव घेत मृतदेह खाली उतरवुन शहर पेालिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांसह परिसरातील रहिवाश्यांनी रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न करुनही रुग्णवाहीका उपलब्ध नसल्याने अखेर रात्री रिक्षातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शहर पेालिसांत या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरु होते.
Discussion about this post