जळगाव । जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
पिंटू बुधा पवार (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. पिंटू पवार गावात शेतमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालवत होते. दरम्यान जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने नद्यांना पूर असून तलावात देखील पाणीसाठा वाढला आहे. या तलावात मासे पडले असल्याने रविवारी (ता. १४) पिंटू हा सायंकाळच्या सुमारास वाकी नदीजवळील तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता.
दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास वाकी नदीच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेला असताना मासे पकडत असताना तलावाच्या काठावरून अचानक त्यांचा पाय घसरला. यामुळे तो तलावाच्या खोल पाण्यात पडला. मात्र पोहता येत नसल्याने पिंटू यास बाहेर निघता आले नाही. यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना आजूबाजूच्या नागरिकांचा लक्षात आली.
सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोहणाऱ्या तरुणांनी पिंटू यास बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पिंटू यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.















Discussion about this post