बोदवड : बांधकामाची क्रेन अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोदवड शहरात घडली. प्रकाश नारायण पालवे (37, रा. जुनी पोस्ट गल्ली, बोदवड) असे मयत तरुणाचे नाव असणं याबाबत बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कापसाच्या गाडीवर हमाली करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार्या प्रकाश पालवे यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. रविवारी दुपारी एकच्या सुमारास जिनिंगमधून कापसाची गाडी भरून तो जेवण्यासाठी घरी जात असताना घराजवळच एका घराचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.
बांधकाम सुरू असताना वरील मजल्यावर सिमेंट गिट्टीचे साहित्य क्रेनने वर चढवले जात असताना त्याचवेळी रस्त्याने प्रकाश हा जात होता. त्याच वेळी क्रेनची साखळी तुटली आणि वाळू व सिमेंटने भरलेली अवजड क्रेन प्रकाशच्या अंगावर कोसळली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रकाश पश्चात पश्चात पत्नी व
मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी पोलिसांना पंचनामा केला आहे. बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Discussion about this post