Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक ! जळगावमध्ये बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणाला चोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक ! जळगावमध्ये बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणाला चोप
बातमी शेअर करा..!
जळगाव । राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी आज जळगावकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोगस मतदानाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एका तरुणाला अपक्ष उमेदवार पियुष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावमधील एका मतदान केंद्रावर हा तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. तो बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा संशय अपक्ष उमेदवार पियुष पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आला. यावरून बाचाबाची होऊन संतप्त कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला मतदान केंद्राच्या परिसरातच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत जमावाच्या तावडीतून त्या तरुणाला सोडवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा तरुण थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. तो या ठिकाणी मतदानासाठी का आला होता आणि त्याच्याकडे असणारी कागदपत्रे अधिकृत आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदान करतानाचा व्हिडिओ-फोटो थेट फेसबुकवर अपलोड? भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Next Post

जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित; गृह विभागाकडून पदोन्नतीचे आदेश

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित; गृह विभागाकडून पदोन्नतीचे आदेश

April 11, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

April 10, 2026
रेशन कार्ड वाल्यांसाठी ३० जून तारीख खूप महत्त्वाची ; हे काम आजच पूर्ण करा..

रेशन कार्डधारकांनो सावधान! ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा धान्याचा पुरवठा कायमचा होणार बंद

April 10, 2026
कोणत्याही परीक्षेशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच अर्ज करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी ! दरमहा ₹२०,००० स्टायपेंड मिळणार ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page