जळगाव/मुंबई । जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी मुंबईत नोवल डॉकमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातून अटक केली आहे. गौरव पाटील असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी (आयएसआय) महिल्याच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय असून त्याने संवेदनशील माहिती पुरवल्याचे सांगितले जात आहे.
नेव्हीमध्ये ज्युनियर पदावर असणारा गौरव पाटील हा फेसबुकवर आरती शर्मा आणि आणखी एका तरुणीच्या संपर्कात आला. . फेसबुकवर हे बनावट अकाउंट्स होते. या माध्यमातून गौरव पाटील याला अडकवण्यात आले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो त्यांचा संपर्कात होता. पाकिस्तानी पीआयओ एजंट्सने गौरव पाटील याच्याकडून गोपणीय माहिती घेतली. एप्रिल, मे 2023 ते ऑक्टोबर 2023 या काळात फेसबुक व व्हॉटसअॅपवर चॅटींग त्यांचे सुरु झाले. गौरव त्यांना गोपनिय माहिती वेळोवेळी देऊ लागला. त्यासाठी ते एजंट गौरव याला पैसे देत होते.
गौरव हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. ठाण्यामध्ये तो वास्तव्यास आहे. फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत आहे. पाकिस्तानी एजंट्सच्या तो संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने गौरव पाटील याच्यावर नजर ठेवली. त्याच्यावरील संशय बळावताच त्याला अटक केली. पाकिस्तानी इंटेलिजन्सला गौरव पाटील याने काही शिप्सची माहिती दिल्याचे तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्र एटीएसने गौरव पाटीलला अटक केली असून आणखी तिघांना आरोपी बनवण्यात आले आहे.















Discussion about this post