जळगाव । शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दीपक भगवान महाजन (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाने टोकाचा निर्णय कौटुंबिक कलहातून की नैराशेतून केली असा तपास पोलिस करत आहेत.
जळगावातील समतानगर परिसरातील दीपक महाजन हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान ५ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास तो हरीविठ्ठलनगरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वे समोर आल्याने गंभीररीत्या जखमी झाला. याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. स्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. मृताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. मृत दीपक पूर्वी आई- वडील, पत्नी, एक मुलगा, भावासह एकत्र कुटुंबात राहत होता. काही महिन्यांपासून दीपक त्याच्या पत्नी- मुलास घेऊन वेगळा निघाला. तो रामानंदनगर रस्त्यावरील चर्चजवळ भाड्याने घर घेऊन राहत होता.















Discussion about this post