जळगाव । जळगाव शहरातील दशरथ नगरात सासरी आलेल्या जवाईचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर रामचंद्र सुर्यवंशी वय ३२ रा. रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सागर सुर्यवंशी हे आपल्या आईवडील, पत्नी, दोन मुलं, भाऊ यांच्यासह वास्तव्याला होते. सोमवारी १४ जुलै रोजी ते जळगावातील दशरथ नगरातील सासरी कामानिमित्त दुचाकीने आलेले होते. मंगळवारी १५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता सागर सुर्यवंशी हे दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असतांना स्पिड ब्रेकरवर त्यांची दुचाकी आदळली गेली.
त्यात ते जमीनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. बुधवारी १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. प्राथमिक तपास पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे















Discussion about this post